दिनांक ११ जानेवारी रोजी, शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांची मुंबईत आढावा बैठक झाली. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या Border Gavaskar Trophy मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला.त्या अनुषंगाने हे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्णधार Rohit Sharma, मुख्य प्रशिक्षक Gautam gambhir आणि मुख्य निवडकर्ता Ajit Agarkar उपस्थित होते. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतलेले पाहायला मिळाले.
या बैठकीत असे ठरवण्यात आले की, खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे आता पगार सुरू करण्यात यावा, विविध माध्यमांनुसार, या प्रस्तावाचा मुख्य उद्देश, खेळाडूने अधिक जबाबदार होऊन खेळणे, व तसे नाही झाल्यास आवश्यकते नुसार त्यांच्या कामगिरीच्या आधारे पगारात कपात करणे. जेणेकरून खेळाडू उत्तमरीत्या खेळेल. एखाद्या खेळाडूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर त्याचा परिणाम त्याच्या कमाईवर होईल. असे या अहवालात म्हटले आहे.
गेल्या वर्षी, आपल्या कसोटी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी बीसीसीआयने पुढाकार म्हणून एक नवीन प्रणाली सुरू केली होती. या अंतर्गत २०२२-२३ च्या हंगामात ५०% पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी ३० लाख रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन मिळेल आणि जे खेळाडू एका हंगामात किमान ७५% सामने खेळतील, ही रक्कम प्रत्येक सामन्यासाठी ४५ लाख रुपये असेल.
भारत कसोटी सामने हरतो तेव्हा सध्याचे खेळाडू थोडे उदासीन होतात का? यावर चर्चा झाली. संघ व्यवस्थापनाला कसोटी क्रिकेटचे महत्त्व कळते, पण अनेक खेळाडू त्याला फारसे महत्त्व देत नाहीत. भारतीय संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयला या समस्येकडे लक्ष देण्याची आणि पुढील पिढीतील खेळाडूंनी पांढऱ्या चेंडूच्या कारकिर्दीपेक्षा कसोटी कॅप्सला अधिक महत्त्व देण्याची विनंती केली आहे.त्याचप्रामणे बीसीसीआयच्या आढावा बैठकीत काही खेळाडू कसोटी क्रिकेटला कमी महत्त्व देत असल्याची चर्चाही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केली. याबाबत गांभीर्य दाखवत नाही. सध्याच्या संघातील काही खेळाडू भारत कसोटी सामने हरल्यावर निराश होतात, अशी चर्चा होती. टीम मॅनेजमेंटला कसोटी क्रिकेटचं महत्त्व कळतं पण अनेक खेळाडू त्याला फारसं महत्त्व देताना दिसत नाही. त्यामुळे जर त्याच्या कामानुसार त्याना मानधन देण्यात आले तर खेळाडू लक्षपूर्वक खेळतील.