Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ६ विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पटकावला आहे. भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद असून यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
टीम इंडियाचे बक्षीस
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ८ वर्षांनंतर आता पुन्हा खेळण्यात आली. यापूर्वी ही स्पर्धा २०१७ मध्ये खेळली गेली होती. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी एकूण बक्षीस रक्कम ६.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी ठेवली, जी आवृत्तीच्या तुलनेत ५३% आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला सर्वाधिक वाट मिळाला. टीम इंडियाला चॅम्पियन बनण्यासाठी २.२४ दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये देण्यात आले, जी या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. याशिवाय भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये देण्यात आले. मात्र दुसरीकडे स्पर्धेत भाग घेण्यासाठी टीम इंडियाला 125,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये देखील मिळाले. त्याचवेळी, उपविजेत्या न्यूझीलंड संघाला ९.७२ कोटी रुपये मिळाले. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ विजेता आणि उपविजेता संघच नाही तर इतर संघांनीही खूप चांगलं बक्षीस रक्कम मिळाली आहे.
इतर संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून मिळाली
इतर संघांनीही खूप चांगलं बक्षीस रक्कम मिळाली असून पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील अफगाणिस्तान आणि बांगलादेशला $३५०,००० (३.०४ कोटी रुपये) मिळतील तर, सातव्या आणि आठव्या स्थानावरील पाकिस्तान आणि इंग्लंडला $१४०,००० (१.२१ कोटी रुपये) मिळतील. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंग्लंड, असे चार संघ बाद फेरीत प्रवेश करू शकले नाहीत.
हे ही वाचा :
Follow Us