spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Champions Trophy 2025 IND vs PAK : दुबईत रंगणार भारत-पाकचा सामना; कोण ठरणार विजयी

Champions Trophy 2025 IND vs PAK : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी दुबई सज्ज झाली असून हा सामना दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. (Champions Trophy 2025) १९ फेब्रुवारीपासून सुरु झाली असून ९ मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना आज २३ फ्रेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

भारताकडून कर्णधार पद रोहित शर्मा भूषवणार असून रोहित सोबत शुभमन गिल सलामीला येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावले होते. शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध नाबाद 101 धावा करत बांगलादेशला मात दिली. त्यातच आता टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज असून या सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष राहणार आहे. हा सामना दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर टॉस दुपारी 2 वाजता होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ निश्चित करण्यात टॉस फॅक्टर निर्णायक ठरणार आहे.

Team IND 2025 :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

Team PAK 2025 :
मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, इमाम उल हक आणि सौद शकील.

दुबईच्या स्टेडियमवर भारत किती सामने खेळला
टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने हे विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss