Champions Trophy 2025 : २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव केला असून न्यूझीलंडने अंतिम फेरीत उडी मारली आहे. याचा अर्थ ९ मार्चला दुबई येथे होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात टीम इंडियाशी आता न्यूझीलंडचा संघ भिडताना दिसणार आहे. स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५० धावांनी मात केली. न्यूझीलंडने केन विलियमसन आणि रचीन रवींद्र या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलर याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून ३१२ धावाच करता आल्या.
डेव्हिड मिलरने बाजी मारली पण संघाला हार मानावी लागली
लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्याच्या संघाने ५० षटकांत ३६३ धावांचे मोठे लक्ष्य गाठले. पण दक्षिण आफ्रिका मात्र हार मानत परतली. तर, दक्षिण आफ्रिकेला डेव्हिड मिलर याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून ३१२ धावाच करता आल्या. न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडची ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची एकूण तिसरी तर २००९ नंतरची पहिली वेळ ठरली. तर आता ९ मार्चला टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स होण्यासाठी महारणखेळी होणार आहे.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा आढावा
न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने १०८ आणि केन विलियसमन याने १०२ धावांची खेळी केली. तसेच डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी प्रत्येकी ४९-४९ धावांचं योगदान दिलं. या चौघांनी प्रमुख खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाची फक्त औपचारिकताच राहिली. मात्र डेव्हिड मिलर याने सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला. मिलरने सामन्यातील शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत शतक पूर्ण केलं. मात्र मिलरची शतकी खेळी दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यासाठी पुरेशी ठरली नाही. अशाप्रकारे न्यूझीलंडने विजय मिळवला. मात्र आता २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेतेपदाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना ९ मार्च रोजी दुबईमध्ये होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारत संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ न्यूझीलंड संघ :
मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश