Champions Trophy 2025 Pak vs NZ: आजपासून म्हणजे १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार असून आज पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये पहिला खेळ रंगणार आहे. पाकिस्तानमधील कराची या मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी २:३० वाजता सुरु होणार आहे. यंदाची चॅम्पियन ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये खेळली जाणार आहे. हा सामना जरी पाकिस्तानने आयोजित केला असला तरी, टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जाणार आहेत. आठ संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा रंगणार आहे. भारत जर अंतिम फेरीत पोहोचला तर जेतेपदाचा सामना देखील दुबईमध्ये खेळला जाणार आहे.
मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार असून मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंड संघाची धुरा आहे.कराचीच्या नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अतिशय योग्य असल्याने या मैदानाची निवड करण्यात आली आहे. याच मैदानावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५३ धावांचे लक्ष्य गाठले होते. त्याचबोबर पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पाकिस्तान क्रिकेट टीम :
मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), फखर जमान, बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.
न्यूझीलंड क्रिकेट टीम :
मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनव्हे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.
पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना तुम्हाला टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओ-हॉटस्टार एपवर पहायला मिळणार आहे. तर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने JioHotstar वर मोफत बघता येणार आहे.