India vs Australia 1st Test series : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये भारताने इतिहास घडवला आहे. भारताने पर्थ ओपट्स स्टेडियममध्ये विजय मिळवणारा पहिला परदेशी संघ ठरला आहे. टीम इंडियाचा जसप्रीत बुमराह याच्या नेतुत्वात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी २९५ धावांनी विजय मिळवला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन संघावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलिया संघावर अधिपत्य गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन करतो. आम्हा तमाम देशवासीयांना आपल्या देदिप्यमान कामगिरीचा सार्थ अभिमान आहे. पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज ठरले गेमचेंजर
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला ३ झटके दिले. नॅथन मॅकस्वीनी झिरोवर आऊट झाला. कॅप्टन पॅट कमिन्स २ आणि मार्नस लबुशेन ३ धावांवर बाद झाले. मार्नस आऊट होताच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या खेळाला ३ बाद १२ धावांपासून सुरुवात केली. उस्मान ख्वाजा ४ आणि स्टीव्हन स्मिथ १७ धावांवर बाद झाले. त्यानंतर ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडला फार वेळ टिकता आलं नाही. हेडने ऑस्ट्रेलियासाठी १०१ बॉलमध्ये ८९ धावा केल्या. मितेल मार्श याने ४७ आणि मिचेल स्टार्कने १२ धावा केल्या. नॅथन लायन आला तसाच झिरोवर परतला. हर्षित राणा याने अॅलेक्स कॅरी याला २६ धावांवर बोल्ड केलं. यासह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला आणि भारताने सामना जिंकला. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर याने दोघांना बाद केलं. तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोन्ही डेब्यूटंट्सने प्रत्येकी १-१ विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”