Cricket Retirment: श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) १०० वा कसोटी सामना खेळून निवृत्त होणार आहे.त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका (Shrilanka) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Austrilia) यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५(ICC world test champoinship) या साखळी फेरीतील शेवटची मालिका आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेवर एक डाव आणि २४२ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी देत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना हा ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान गॉल येथे होणार आहे. त्याआधी श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा दिमुथच्या कारकीर्दीतील १०० वा सामना असणार आहे. या सामन्यानंतर दिमुथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट टीमचा दिमुथला विजयी निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे.
दिमुथने जिथून कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली तिथेच तो शेवट करणार आहे. दिमुथने १७ नोव्हेंबर २०१२ साली न्यूझीलंडविरुद्ध गॉलमध्ये कसोटी मध्ये पदार्पण केलं होतं. दिमुथने तेव्हापासून ते आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यांमधील १८९ डावांमध्ये १ द्विशतक,१६ शतकं आणि ३९ अर्धशतकांसह ७ हजार १७२ धावा केल्या आहेत. तर आता दिमुथ १०० व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात गॉलमध्ये कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करण्याचा प्रयत्न दिमुथ करणार आहे. जर मी शतक केलं तर ते माझ्यासाठी चांगलं असेल. “फक्त १०० व्या कसोटी सामन्यातच नाही तर प्रत्येक सामन्यात सेंच्युरी करुन संघासाठी योगदान देण्यासाठी मी उत्सूक आहे. जर मी १०० कसोटी सामन्यात शतक केलं तर ते माझ्यासाठी मौल्यवान असेल.
पुढे तोच म्हणाला, मी माझ्या कारकीर्दीबाबत समाधानी आहे. माझ्यासाठी १०० कसोटी सामने खेळणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. “कोणत्याही क्रिकेटरचं १०० कसोटी खेळणं आणि १० हजार धावा (Run) करणं हे स्वप्न असतं. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्याबाबत विचार करत नाही, मात्र जेव्हा तुम्ही सातत्याने खेळता तेव्हा तुमच्यासमोर वेगवेगळी लक्ष्य असतात”, असं दिमुथने म्हटलं.
हे ही वाचा :
Maharashtra kesari स्पर्धेवरून बिग बॉस मराठी फेम DP ची पोस्ट चर्चेत
Delhi Election Polling: दिल्ली विधानसभा निवडणूकीची धामधूम; अवघ्या काही तासांवर निवडणूक