Thursday, March 28, 2024

Latest Posts

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

आयपीएल २०२३ मध्ये आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल २०२३ (IPL2023) मध्ये आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier league 2023) च्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा हा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi stadium)  खेळवला जाणार आहे. गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. त्यामुळे गुजरातचा संघ किती धावांचे आव्हान चेन्नईसमोर उभे करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) या दोन्ही संघानी केलेला नाही. दोन्ही संघाने मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे.

गुजरात टायटन्सच्या संघाने मागील वर्षांमध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि त्यांनी पहिल्याच वर्षी इंडियन प्रीमियर लीग २०२३ ची ट्रॉफी नावावर केली. आज ते पुन्हा दुसरी ट्रॉफी त्यांच्या नावी करतील का? याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तर चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासामध्ये चार वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद जिंकले आहे.

त्यामध्ये गुजरातच्या संघाला मोठे आव्हान असणार आहे. यंदाची आयपीएलची ट्रॉफी जिंकून चेन्नई सुपर किंग्स पाचव्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. चेन्नई आजची ट्रॉफी जिंकल्यास ते मुंबई इंडियन्सची बरोबरी करतील. आयपीएल च्या इतिहासामध्ये सर्वाधिक पाच वेळा विजयी झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार या दोघांची काय रणनीती असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss