Saturday, June 3, 2023

Latest Posts

CSK vs GT, एमएस धोनीचा अनुभव की हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी, कोण मारणार बाजी?

आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या प्लेऑफच्या (playoffs) शर्यतीला आजपासून सुरुवात होणार आहे आजचा क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स Chennai Super Kings vs Gujarat Titans) या संघांमध्ये रंगणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) च्या प्लेऑफच्या (playoffs) शर्यतीला आजपासून सुरुवात होणार आहे आजचा क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स Chennai Super Kings vs Gujarat Titans) या संघांमध्ये रंगणार आहे. यंदाचा हा सिझन सुरुवातीपासूनच अत्यंत रोमांचक ठरला आहे. आजचा हा चेन्नईमधील चेपॉक स्टेडियम वर होणार आहे. आज प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स समोर गतविजेत्या गुजरात संघाचं आव्हान असणार आहे. आजचा हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता रंगणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यत चार वेळा अंतिम विजेतेपद पटकावलं आहे.

गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा सीझनचा विजेता होण्याची संधी आहे. अशा परिस्थितीमध्ये एमएस धोनीचा (MS Dhoni) अनुभव गुजरात टायटन्स समोर आव्हान उभे करू शकेल का? या कडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हे दोन्ही संघानी या हंगामामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. परंतु गुजरात टायटन्सने या सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गुजरातच्या संघाने या सीझनमध्ये १४ सामन्यांपैकी एकूण १० सामने जिंकून २० गुणांसह गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने १४ सामन्यांपैकी आठ सामने जिंकून १७ गुणांसह प्लेऑफ मध्ये स्थान मिळवले आहे आणि गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत.

मागील वर्षापासूनच गुजरात टायटन्सची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. गुजरातच्या संघाने पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपदावर आपलेनाव कोरले आहे. त्यामुळे गुजरात चा संघ प्लेऑफचा सामना खेळण्यांमध्ये माहीर आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर आयपीएलमध्ये विक्रमी १२ वेळा प्लेऑफ मध्ये प्रवेश केला आहे. एवढेच नाही तर नऊ वेळा अंतिम फेरीत प्रवेश प्रवेश करून चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. क्वालिफायर १ चा सामना कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss