Thursday, April 25, 2024

Latest Posts

CSKvsDC, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स, कोण मारणार बाजी

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) या दोन संघामध्ये रंगणार आहे.

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) या दोन संघामध्ये रंगणार आहे. सध्या गुणतालिकेमध्ये दिल्लीचा संघ हा तळाला आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ सुसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई च्या संघाने मुंबईला मागच्या सामन्यांमध्ये पराभूत केले होते. तर दिल्लीने आरसीबीला मागच्या सामन्यामध्ये पराभव केले होते. दिल्ली च्या संघाची या सिझनची सुरुवात ही निराशाजनक होते. परंतु मागील सलग दोन सामने दिल्लीचा संघ विजयी झाला आहे. आजच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे प्लेऑपच्या दिशेने एक पाऊल पडले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वच्या सर्व सामने महत्वाचे आहेत. दिल्लीने आजचा सामना जिंकला नाही तर स्पर्धेतून बाहेर असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आजचा सामना एम ए चिंदबरम मैदानामध्ये खेळवला जाणार आहे. मागच्या या सामन्यामध्ये या मैदानावर मोठी धावसंख्या उभी राहिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही मोठी धावसंख्या होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते. दोन्हीकडून फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजी करण्याचा निर्णय फायद्याचा ठरेल.

चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग ११
डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), शिवम दुबे, तुषार देशपांडे, दीपक चाहर, महेश तीक्षणा, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग ११
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनिष पांडे, रिले रोस्सो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), अमन हाकिम खान

हे ही वाचा : 

The kerala story चित्रपटांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, सडलेल्या मनाच्या विचारांना….

Karnataka विधानसभा निवडणुकीसाठी आज होणार मतदान, कुणाची सत्ता येणार?

उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा, घरगुती मसाला ताक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss