IPL 2025 Mega Auction Date And Venue : भारतीय क्रीडा वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आयपीएल १८ व्या मोसमासाठी (IPL 2025) सर्व १० फ्रँचायजींनी रिटेन अर्थात राखून ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली होती. त्यानंतर सर्व क्रिकेटपटूंना आणि चाहत्यांना आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन कुठे होणार? याची प्रतिक्षा लागून होती. याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने सोशल मीडियावरुन मेगा ऑक्शन कुठे आणि कधी होणार? याबाबतची अखेर घोषणा केली आहे.
आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन हे एकूण २ दिवस चालणार आहे. तसेच यंदा परदेशात ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शन २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे पार पडणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हा २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तसेच या मेगा ऑक्शन दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु असणार आहे. या सामन्यादरम्यान अनेक खेळाडूंचं भवितव्य निश्चित होणार आहे. कोणता खेळाडू महागडा ठरणार? कोण अनसोल्ड राहणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ही रविवारी आणि सोमवारी मिळणार आहेत.
आयपीएल ऑक्शनचं परदेशात आयोजन करण्याची ही स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी वेळ आहे. यंदाचा मेगा ऑक्शन अबादी अल जोहर एरिना येथे होणार आहे. हा मेगा ऑक्शन हॉटेल शांगरी-ला येथे होणार आहे. तर याआधी आयपीएल २०२४ साठी मिनी ऑक्शन हे दुबईत आयोजित करण्यात आलं होतं. तेव्हा फक्त १ दिवसातच हे ऑक्शन पार पडलं होतं. मात्र यंदा मेगा ऑक्शन होणार असल्याने २ दिवस लागणार आहेत.
दरम्यान आयपीएलच्या १८ व्या मोसमासाठी मेगा ऑक्शनमध्ये तब्बल १ हजार ५४७ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. त्यामध्ये ३२० कॅप्ड, १ हजार २२४ अनकॅप्ड तर ३० खेळाडू हे असोसिएट देशाचे खेळाडू आहेत. या १ हजार ५७४ मधून फक्त २०४ खेळाडूंचीच निवड केली जाणार आहे. कॅप्ड म्हणजे आपल्या देशांचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू. तर या वर्षापासून अनकॅप्ड खेळाडूची व्याख्या बदलली आहे. देशासाठी न खेळलेला आणि ५ वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू या दोघांची गणना ही अनकॅप्ड म्हणूनच केली जाणार आहे.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर