Wednesday, June 7, 2023

Latest Posts

DC vs PBKS, डेविड वॉर्नर आणि शिखर धवन आमनेसामने

आयपीएल २०२३ (IPL 2023) मधील आजचा सामना दिल्ली कपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) या संघांमध्ये रंगणार आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मधील आजचा सामना दिल्ली कपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) या संघांमध्ये रंगणार आहे. आजचा हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२३ च्या सीझनमध्ये दिल्ली कपिटल्स आणि पंजाब किंग्स या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहे. या आधी झालेल्या सामन्यांमध्ये पंजाबने ३१ धावांनी विजय मिळवला होता. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये ३१ सामने खेळले गेले आहेत. पंजाब किंग्सने १६ आणि दिल्ली कॅपिटल्सने १५ सामने जिंकले आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर या दोन्ही संघाचे सर्वाधिक सामने झाले आहेत. या स्टेडियमवर दोन्ही संघानी ६-६ सामने जिंकले आहेत.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला (Himachal Pradesh Cricket Association Stadium, Dharamshala) या मैदानावर याआधी दोन्ही संघ या पूर्वी ३ सामने खेळले आहेत. त्यामध्ये पंजाबने २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर तर दिल्लीच्या संघाने १ सामना जिंकला आहे. या सीझनमधील या मैदानावरील आजचा हा पहिला सामना असणार आहे. आजच्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

पंजाब किंग्स संघाची संभाव्य प्लेइंग ११
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, सॅम करन, सिकंदर रजा, शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, अर्शदीप सिंह

दिल्ली कॅपिटल्स संघाची संभाव्य प्लेइंग ११
डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, मनीष पांडे, ईशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss