Degree In Cricket : आजकाल क्रिकेट हा खेळ सर्वच स्तरावर खेळला जातो.आता क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. क्रिकेटसाठी अनेक क्षेत्रांतून मदत मिळत असते तुम्हाला देखील क्रिकेटचं ज्ञान आहे? क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे? तर आता क्रिकेट फक्त खेळ न राहता क्रिकेट मधून तुम्हाला पदवीधर होण्याची संधी मिळणार आहे. नुकताच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट संघटना लवकरच एमसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हमहत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेट मध्ये रस असेल तर अभ्यास करून तुम्ही पदवीधर होऊ शकता. या अभ्यासक्रमात प्रवेश घेणारा विद्यार्खी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असावा. त्याने अंडर १९, २३ वर्षाखाली खेळले पाहिजे. मैदानाची निगा, तसेच खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींमध्ये या अभ्यासक्रमाद्वारे प्रावीण्य मिळवता येईल. यात क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष मैदानावर शिकण्याचा अनुभव मिळेल. खेळताना त्यांना विविध विषयांत व्यावसायिक कौशल्य मिळवता येईल.
त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक पात्रताही मिळेल’, असे ‘एमसीए’चे ( mumbai cricket association ) सचिव अभय हडप यांनी सांगितले. ‘याबाबत या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व बाबी निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचा प्रयत्न असेल’, असेही त्यांनी सांगितले. खेळ या विषयातून क्रिकेट मधून पदवीधर होणे हे प्रथमच होणार आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यातून होणाऱ्या या निर्णयाचा स्वागत केले जातंय. तर क्रिकेट मध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
हे ही वाचा:
माझ्या घरात तलवारी असायच्या, सासऱ्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध – अभिनेत्री Janhavi Killekar
Chhaava Movie: ‘छावा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई !