Axar Patel Delhi Capitals Captain IPL 2025 : आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुलला सोडले होते. मेगा लिलाव झाला तेव्हा अनेक संघ होते ज्यांना यष्टिरक्षक तसेच कर्णधारपद सांभाळू शकेल असा खेळाडू हवा होता. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने त्याच्यावर बोली लावली, पण शेवटी दिल्ली कॅपिटल्सने त्याला 14 कोटी रुपयांना विकत घेतले. राहुल कर्णधार होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र आता अक्षर पटेलला दिल्लीचे कर्णधारपद दिले जाऊ शकते, असे एका अहवालातून समोर आले आहे.
ANI वृत्तसंस्थेनुसार, IPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद अक्षर पटेलकडे सोपवले जाऊ शकते. दिल्ली संघाने केएल राहुल आणि फाफ डू प्लेसिस सारख्या वरिष्ठ खेळाडूंना खरेदी केले होते. हे दोघेही यापूर्वी दिल्ली संघासाठी खेळले आहेत, तरीही फ्रेंचायझी 2019 पासून डीसीकडून खेळत असलेल्या अक्षर पटेलवर विश्वास ठेवू शकते.
काही काळापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी आयपीएल 2025 मध्ये अक्षर पटेल दिल्लीचा कर्णधार होऊ शकतो असा मोठा इशारा दिला होता. गेल्या मोसमातही अक्षर दिल्ली संघाचा उपकर्णधार होता, मात्र आता त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणे पूर्णपणे शक्य आहे, असे तो म्हणाला. पण मोसम सुरू होण्याच्या कित्येक महिने आधी कर्णधाराबद्दल काहीही स्पष्ट सांगता येणार नाही, असेही तो म्हणाला. आजकाल अक्षर पटेलचे नाव देखील चर्चेत आहे कारण त्याची इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती