Sunday, June 4, 2023

Latest Posts

धोनी पांड्या आणि रोहित कोण कोरणार आयपीएल २०२३ च्या ट्रॉफीवर नाव

आयपीएल २०२३ (IPL 2023) ची लढत सुरु आहे आणि काही दिवस राहिले आहेत आयपीएलच्या फायनलसाठी. क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला आणि चेन्नई सुपर किंग्सने (Chennai super kings) गुजरात टायटन्सला (Gujrat Taitans) पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

आयपीएल २०२३ (IPL 2023) ची लढत सुरु आहे आणि काही दिवस राहिले आहेत आयपीएलच्या फायनलसाठी. क्वालिफायर १ (Qualifier 1) चा सामना पार पडला आणि चेन्नई सुपर किंग्सने (Chennai super kings) गुजरात टायटन्सला (Gujrat Taitans) पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनतर आयपीएल २०२३ चा एलिमिनेटर (Eliminator) सामना पार पडला आणि त्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ८१ धावांनी लखनौ सुपर जायंट्स पराभवाची धूळ चारली. एलिमिनेटर सामना जिंकून मुंबई इंडियन्सने क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला गुजरात टायटन्सच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ आज क्वालिफायर २ चा सामना खेळणार आहे. गुजरात समोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.

या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर गुजरात टायटन्सचा संघ भारी पडला आहे. गुजरातच्या संघाने या सीझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये जाणारा सर्वात पाहिला संघ आहे. या सिझमध्ये चेन्नईच्या संघाने खाते उघडायला थोडा उशीर झाला होता. परंतु शेवटी चेन्नई सुपर किंग्सने दमदार प्रदर्शन करून करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

आयपीएलमध्ये आतापर्यत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा संघ आमनेसामने असणार आहे. आयपीएलच्या आकडेवारीनुसार मुंबई इंडियन्सचे पारडे जड आहे. आतापर्यत ३ सामने झाले आहेत त्यापैकी दोन सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातने अहमदाबादमध्ये या सुरुवातीला विक्रमी आयपीएल विजेत्या मुंबईचा पराभव केला होता. या सीझनमध्येमध्ये गुजरातचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ला फॉर्ममध्ये येण्यासाठी वेळ लागला यावर्षीच्या आयपीएल २०२३ ट्रॉफीवर कोणता संघ नाव करेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss