Thursday, April 18, 2024

Latest Posts

World Test Championship Final मध्ये ऑस्ट्रेलिया संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील क्रिकेट चाहते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल २०२३ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील क्रिकेट चाहते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल २०२३ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध बलाढ्य ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा सामना इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियम वर खेळवण्यात येणार आहे. ७ जून ते ११ जून या दरम्यान हे सामने रंगणार आहेत. त्यांनतर १२ जून हा राखीव दिवस असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल २०२३ चे सामने ७ जून पासून दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. यादरम्यान इंग्लंड मधून एक मोठी अपडेट आली आहे. टीममध्ये एक घातक खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या गटात झिंबाब्वेचे माजी कर्णधार एंडी फ्लॉवर यांची एन्ट्री झाली आहे. एंडी फ्लॉवर यांची ऑस्ट्रेलिया टीममध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाला फ्लॉवर यांच्या या अनुभवाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये फायदा होईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम ऑस्ट्रेलिया –
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss