Monday, June 5, 2023

Latest Posts

सामन्यापूर्वीच अर्जुन तेंडुलकरच्या हाताला घेतला बाइट

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्या संबंधित एक वाईट घटना घडली आहे. या वर्षांमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला कुत्रांने चव घेतला आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्या संबंधित एक वाईट घटना घडली आहे. या वर्षांमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला कुत्रांने चव घेतला आहे. तेही अर्जुन गोलंदाजी करताना त्याला कुत्र्याने चव घेतला आहे हि माहिती स्वतः अर्जुनने दिली आहे. हा व्हिडीओ लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून ट्विट केला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊचे खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खान यांची भेट घेत आहे.

या दरम्यान युद्धवीर सिंगने अर्जुनला त्याची प्रकृती विचारली तेव्हा त्याने उत्तर दिले आणि देताना अर्जुनने सांगितले की, त्याला कुत्रा चावला आहे आणि याच कारणामुळे त्यांच्या गोलंदाजीच्या हाताला बोटामध्ये जखम झाली आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार या घटनेमुळे अर्जुनला खोल जखम झाली आहे त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या विरुद्ध सामन्यांमध्ये खेळणे कठीण जात आहे. हा सामना आज १६ मे रोजी होणार आहे.

अर्जुन तेंडुलकरने या सीझनमध्ये चार सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने एकूण १३ धावा केल्या आहेत. त्यांच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर चार सामन्यांमध्ये त्याने ३०.६७ च्या सरासरीने त्याने एकूण तीन बाली घेतले आहेत. या सीझनमध्ये कोलकाता विरुद्ध पदार्पण करणाऱ्या अर्जुनने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचा सामना त्याने खेळाला आहे.

Latest Posts

Don't Miss