सिक्सर किंग युवराज सिंहनं (Yuvraj Singh) एका मुलखतीत बोलताना महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि त्याच्या मैत्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्यात आणि धोनीमध्ये कधीच घट्ट मैत्री नव्हती, असं युवराज म्हणाला. युवराजच्या या वक्तव्यानं चाहते पुरते हैराण झाले आहेत. युवराज असं का म्हणाला? त्यानं नेमकं म्हणायचं काय आहे? अशा अनेक प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात काहुर माजवलं आहे.
युवराज सिंहनं एका मुलाखतीत महेंद्रसिंह धोनीसोबतच्या मैत्रीबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्याच्यात आणि धोनीमध्ये कधीच घट्ट मैत्री नव्हती, असं त्यानं म्हटलं आहे. त्यानं असंही सांगितलं की, तो आणि धोनी मित्र होते कारण ते एकत्र क्रिकेट खेळले पण कधीच जवळचे, घट्ट मित्र नव्हते. यावेळी युवराजनं धोनीसोबत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील प्रदीर्घ काळ घालवल्याबद्दलही सविस्तर भाष्य केलं.
टीआरएस क्लिपवरील एका चॅट शोमध्ये युवी म्हणाला की, “मी आणि माही जवळचे मित्र नाही. आम्ही मित्र होतो, कारण आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो पण माही आणि माझी लाईफस्टाईल खूप वेगळी होती. त्यामुळे आमच्यात घट्ट मैत्री झाली नाही. मैदानाबाहेर तुमचे सहकारी तुमचे चांगले मित्र असतीलच असं नाही. प्रत्येकाचीच जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. कोणत्याही एका संघाकडे पाहा, सर्व 11 खेळाडू एकत्र हँग आउट करताना तुम्हाला कधीच दिसत नाहीत.
युवराज म्हणाला की, “मी आणि माही जेव्हा मैदानात उतरायचो तेव्हा आम्ही दोघेही देशासाठी 100 टक्के द्यायचो. तो कर्णधार आणि मी उपकर्णधार. आमच्या निर्णयांमध्ये मतभेद असायचे. त्याचे काही निर्णय असे होते की, मला कधी आवडलेच नाही आणि माझे काही निर्णय त्याच्या समजण्याच्या पलीकडे होते. हे प्रत्येक संघासोबत घडतं. या काळात एकमेकांना मदत केल्याचा उल्लेखही युवराजनं केला आहे. यावेळी बोलताना युवराजनं एकदा धोनीला शतक पूर्ण करण्यात कशी मदत केली, हे सुद्धा सांगितलं आहे. त्यानं असंही सांगितलं की, धोनीनंही एकदा त्याचं अर्धशतक पूर्ण करताना त्याला साथ दिली होती.
…जेव्हा युवराजनं धोनीकडून घेतलेला करियरबाबत सल्ला
युवराजनं बोलताना आपल्या मुलाखतीत बोलताना काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यानं धोनी आणि त्याच्यातील एक किस्सा सांगितला. एख वेळ अशी होती की, युवराज सिंहनं धोनीकडून आपल्या करिअरबाबत सल्ला घेतला होता. त्यानं सांगितलं की, “जेव्हा मी करियकच्या शेवटच्या टप्प्यात होतो आणि त्यावेळी मी माझ्या भविष्याबाबत काहीच विचार केलेला नव्हता. त्यावेळी मी धोनीकडून कारकीर्दीबाबत सल्ला घेतलेला. त्यावेळी धोनीच होता ज्यानं मला सांगितलेलं की, निवड समिती सध्या तुझ्याबद्दल विचार करत नाही. माझी स्थिती अशी होती की, मला खरी परिस्थिती आणि काय चाललंय हे कळलं पाहिजे. हा किस्सा विश्वचषक 2019 च्या आधी होतं आणि ते खरं आहे.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.