Tuesday, April 16, 2024

Latest Posts

IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना राखीव दिवशी रंगणार

आयपीएलच्या (IPL) इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की अंतिम सामन्याच्या दिवशी नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) धुव्वादार पाऊसामुळे इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (Indian Premier League 2023) अंतिम सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.

आयपीएलच्या (IPL) इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की अंतिम सामन्याच्या दिवशी नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) धुव्वादार पाऊसामुळे इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (Indian Premier League 2023) अंतिम सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. आजचा दिवस हा आयपीएल २०२३ चा ऐतिहासिक दिवस असणार आहे. आज सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. गुजरातमध्ये काल धुव्वादार पावसामुळे कालचा सामना रद्द करावा लागला. आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

परंतु कालचा रद्द झालेल्या सामन्यामुळे अनेक चाहते हे नीरज झाले आहेत. परंतु आज कोणता संघ आयपीएल २०२३ च्या ट्रॉफी वर नाव कोरणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयपीएल २०२३ चा अंतिम सामना हा गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आजच्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामधील आयपीएल २०२३ चा अंतिम सामन्याकडे आज सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

असे सांगण्यात येत आहे की २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट असणार आहे. जर आजचा सामना रद्द झाला तर याचा फायदा गुजरात टायटन्सच्या संघाला होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये सध्या गुजरातचा संघ हा अव्वल स्थानावर आहे. जर २९ मे रोजी अंतिम सामना रद्द झाल्यास आयपीएल गुणतालिकेमधील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला महाविजेता म्हणून घोषित करण्यात आले होते. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला याचे नुकसान सहन करावे लागेल. कारण चेन्नई चा संघ गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

IPL 2023 Final, आज रंगणार महामुकाबलाचा थरार… कोण पटकवणार IPL 2023 मान? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss