Geoff Allardice Steps Down as ICC CEO : चॅम्पियन ट्रॉफी १९ फेब्रुवारी, २०२५ म्हणजे पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जोमात तयारी करत आहे. परंतु दुसरीकडे आयसीसीमध्ये वेगळ्याच दिशेने वारे वाहत आहेत. कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या काही दिवस आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) CEO ज्योफ ॲलार्डिस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. ॲलार्डिस गेल्या चार वर्षांपासून या भूमिकेत पूर्णवेळ काम करत होते, पण आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात आता आयसीसीनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
ज्योफ ॲलार्डिस यांची CEO पदासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी आठ महिने कार्यवाहक CEO म्हणून काम केले होते.ॲलार्डिस गेल्या चार वर्षांपासून या भूमिकेत पूर्णवेळ काम करत होते, पण आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीनेही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
ज्योफ ॲलार्डिस यांनी निवेदन जाहीर केले आणि या निवेदनात त्यांनी असे म्हंटले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि क्रिकेटची जागतिक पोहोच वाढवण्यापासून ते आयसीसी सदस्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्यावसायिक पायापर्यंत आम्ही मिळवलेल्या निकालांचा मला अतुलनीय अभिमान आहे, क्रिकेटची जागतिक व्याप्ती वाढवण्यापासून ते आयसीसी सदस्यांसाठी पाया निर्माण करण्यापर्यंत, आम्ही जे काही साध्य केले आहे त्याचा मला अविश्वसनीय अभिमान आहे. मी आयसीसीमध्ये निवडून आलो. गेल्या १३ वर्षांपासून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी आयसीसी अध्यक्ष, संचालक मंडळ आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाचे आभार मानू इच्छितो.” ॲलार्डिस म्हणाला.
हे ही वाचा :