Tuesday, March 19, 2024

Latest Posts

थायलंड बॅटमिंटन स्पर्धेमध्ये दिग्गजांचा पराभव, किरण जॉर्जने केली उत्तम कामगिरी

भारताची ओलंम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत या मुख्य खेळाडूंना थायलंड बॅटमिंटन स्पर्धेमध्ये पहिल्याच फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

भारताची ओलंम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत या मुख्य खेळाडूंना थायलंड बॅटमिंटन स्पर्धेमध्ये पहिल्याच फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे किरण जॉर्जने (Kiran George) या लीगमध्ये उत्तम सुरुवात करून तो आता प्रेक्षकांच्या नजेरेत आला आहे. किरणने पहिल्याच फेरीत तिसऱ्या नामांकित आणि जागतिक क्रमवारीमध्ये नवव्या स्थानावर असलेल्य्या शी यु की (Shi Yu Ki) चा पराभव केला आहे.

किरणने २१-१८, २२-२० असा शी यु की चा पराभव केला आहे. आतापर्यत किरणची सर्वात्तम कामगिरी आहे. या स्पर्धेमध्ये लक्ष्य सेनने पहिला अडथळा दूर केला परंतु त्याला ३ गेमचा सामना करावा लागला होता. चायनीज तैपेईच्या वँग त्झ वेईचा २१-२३, २१-१५, २१-१५ असा पराभव केला.

भारताचा दुहेरी गट सात्विक – चिरागने डेन्मार्कच्या रॅस्मस कायार-फ्रेड्रिक सोगार्ड जोडीच्या संघर्षमय लढतीत २१-१३, १८-२१, २१-१७ असावं परतवून लावले. महिला एकेरीमध्ये अस्मिता चाहीलाने मालविका बनसोडचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. सायनाने कॅनडाच्या वेन यु झाँगवर २१-१३, २१-७ असा विजय मिळवला. अस्मिता चाहीलासमोर आता ओलंम्पिक विजेती कॅरोलिन मरिनचे आव्हान असणार आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss