Tuesday, June 6, 2023

Latest Posts

GT vs MI, Mumbai Indians Qualifier 2 ला पावसाने लावली हजेरी, न खेळताच ‘बाद’ होणार?

सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी एक आणि मोठी वाईट बातमी समोर आली आहे. कारण आजच्या सामन्याआधीच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात पाऊस होतोय.

आज इंडियन प्रीमियर लीग २०२३ (Indian Premier League 2023) मध्ये क्वालिफायर २ (Qualifier 2) सामना आहे. आजचा सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पाच वेळा विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ या दोन संघामध्ये आजचा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्ससाठी एक आणि मोठी वाईट बातमी समोर आली आहे. कारण आजच्या सामन्याआधीच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात पाऊस होतोय.

आजच्या या सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. आयपीएल स्पर्धेत वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता टॉस होतो. तर त्यानंतर अर्ध्या तासाने ७ वाजून ३० मिनिटांनी सामन्याला सुरुवात होते. मात्र आता अहमदाबादमध्ये पावसामुळे टॉसला विलंब होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. खेळपट्टी ओली झाल्याने टॉसला विलंब होणार आहे. त्यामुळे निश्चितच सामना सुरु व्हायला उशीर होईल. या पावसामुळे मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. कारण पावसामुळे सामना रद्द झाला, तर मुंबई सामना न खेळताच क्वालिफायर मधून आऊट होईल. तर गुजरात थेट अंतिम सामन्यात पोहचेल. त्यामुळे हा पाऊस थांबावा यासाठी पलटणने वरुणराजाला ट्विट करुन “जा रे जा रे पावसा”, असं म्हटलंय.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ११ –

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, आकाश मधवाल, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग ११ –

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

Latest Posts

Don't Miss