Friday, April 26, 2024

Latest Posts

Gujrat Titans ची यंदाची कामगिरी, IPL 2023 चा प्रवास

मागील वर्षात पदार्पण केलेला गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्याच वर्षी इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ट्रॉफीवर नाव कोरले. यावर्षी सुद्धा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

मागील वर्षात पदार्पण केलेला गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्याच वर्षी इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ट्रॉफीवर नाव कोरले. यावर्षी सुद्धा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यंदाच्या सीझनमध्ये सुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये गुजरातच्या खेळाडूने दमदार कामगिरी गेली आणि फायनलचा उडी मारली. गुजरातच्या खेळाडूंनीच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. गुजरातने आयपीएल २०२३ मध्ये प्लेऑफच्या आधी एकूण १४ सामने खेळले आहे. त्यापैकी गुजरात टायटन्सचा संघ १० सामन्यांमध्ये विजयी झाला आहे तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएल २०२३ च्या सिझनची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांच्या सामान्याने झाली होती. पहिल्याच सामन्यामध्ये विजय मिळवून गुजरातने सिझनची सुरुवात दणक्यात केली. पहिल्याच सामन्यामध्ये गुजरातने चेन्नईचा पाच विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर ४ एप्रिल रोजी खेळवण्यात आलेला गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटस यामध्ये गुजरातने दिल्लीचा सहा विकेट्सने पराभव केला. ९ एप्रिल रोजी पार पडलेला कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यांमध्ये गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनतर गुजरात टायटन्सची लढत पंजाब किंग्ससोबत झाली या सामन्यामध्ये गुजरातने पंजाबचा सहा विकेट्सने पराभव केला. १६ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात राजस्थानने गुजरातचा तीन विकेट्सने पराभव केला. २२ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यामध्ये गुजरातचा लखनौ सुपर जायंट्सवर ९ धावांनी विजय मिळवला.

 

२५ एप्रिल रोजी पार पडलेला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स मध्ये गुजरातने मुंबईचा ५५ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर २९ एप्रिल रोजी गुजरातने बदल घेत कोलकाताला ७ विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर सलग दुसऱ्याच सामन्यामध्ये गुजरातचा संघ पराभूत झाला. दिल्लीने गुजरातला ५ धावांनी हरवले. ५ मे रोजी गुजरातने राजस्थानला नऊ विकेट्सने पराभूत केले. ७ मे रोजी पार पडलेला मुंबई विरुद्ध गुजरात सामन्यांमध्ये मुंबई गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. गुजरात आणि हैदराबादचा १५ मे रोजी पार पडलेला सामना या सामन्यामध्ये गुजरातने हैदराबादचा दारुण पराभव केला. प्लेऑफच्या आधीचा सामना गुजरात विरुद्ध बंगलोर या सामन्यामध्ये गुजरातने आरसीबीचा २० धावांनी पराभूत केले. त्यानंतर पार पडलेला क्वालिफायर १ च्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरातला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर कालचा पार पडलेला क्वालिफायर २ च्या सामन्यामध्ये गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss