भारतीय खेळाडू (INDIAN PLAYER) हार्दिक पंड्या (HARDIK PANDYA) दुखापतीतून न सावरल्यामुळे वर्ल्डकप (WORLDCUP) स्पर्धेत खेळू शकणार नाही. यामुळे क्रिकेट प्रेमींची निराशा झाली आहे. हार्दिक पंड्या ऐवजी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. आयसीसीच्या (International Cricket Council) तांत्रिक समितीने कृष्णाच्या समावेशाला परवानगी दिली आहे. संतुलन राखण्याच्या दृष्टीने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भारतीय संघात असणे आवश्यक होते. दहा सिक्सर गोलंदाजी किमान दहा ते बारा सिक्सरची फलंदाजी उत्तम क्षेत्ररक्षण आणि संघाचे उपकरण आधार पद अशा अनेक दृष्टीने हार्दिक असणे महत्त्वाचे मानले जात होते. बांगलादेश विरुद्ध पुणे येथे झालेल्या मॅचमध्ये हार्दिकच्या घोटाला दुखापत झाली होती मैदानात त्याच्यावर उपचारही करण्यात आले होते. त्यानंतर त्याने चालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याने धावण्याचा चालण्याचा प्रयत्न केला रणपमध्ये धावता येते की नाही हे त्याने पाहिले पण दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्याला स्पर्धेत खेळता आले नाही.
कृष्णाने 19 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे वर्ल्ड कप आधी झालेल्या मॅच मध्ये तो खेळला होता हार्दिकच्या गैरहजेरीमध्ये मिळालेल्या मोहम्मद शमीने दमदार कामगिरी करत संघाची चिंता मिटवली. शमीने तीन सामन्यात 14 विकेट्स पटकावले आहेत. हार्दिक पंड्या संघात नसल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला दोन बदल करावे लागले होते. सूर्यकुमार यादव याला सुद्धा संघात स्थान मिळाले आहे. हार्दिकच्या गैरहजेरी मध्ये अक्षर पटेल संघात येण्याची शक्यता होती. मात्र, रवींद्र जडेजा (RAVINDRA JADEJA) आणि कुलदीप यादव (KULDEEP YADAV) हे फिरकीपटू उत्तम कामगिरी करत होते. त्यामुळे अक्षरच्या नावाला पसंती देण्यात आली नाही या दोघांच्या बरोबरीने अनुभवी चंद्रन अश्विन संघात असल्याने अक्षरचे नाव मागे पडले. आता हार्दिकच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदर च्या नावाचे ही चर्चा करण्यात आली होती.
हे ही वाचा :
आजचे राशिभविष्य, ४ नोव्हेंबर २०२३, शनिवार, आर्थिक लाभ होण्याची शक्यता…
छत्तीसगडच्या भाजपचा जाहीरनामा, सरकारी नोकऱ्या मिळणार