Saturday, December 2, 2023

Latest Posts

World Cup मधून बाहेर पडल्यावर Hardik Pandya ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. तर या नंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया ही समोर आली आहे.

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा २०२३ च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. पांड्याच्या जागी प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. पांड्या उपांत्य फेरीतून बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. तो अनुभवी खेळाडू असून त्याने अनेक मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. हार्दिक या कारणामुळे न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला नाही. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. तर या नंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया ही समोर आली आहे.

टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. पांड्याने याद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत. हार्दिकच्या जागी प्रसिध कृष्णाला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. पांड्याने ट्विटर म्हणजे X वर एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”विश्वचषकातील उर्वरित सामन्यांमध्ये मी खेळू शकणार नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मी उत्कटतेने संघासोबत असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर मी त्यांचा जयजयकार करेन. तुमच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. ही टीम माझ्यासाठी खूप खास आहे आणि मला खात्री आहे की आमच्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. हार्दिकची ही एक्स पोस्ट अल्पावधीतच सुमारे १ लाख लोकांनी पाहिली. यासोबतच १८ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. पांड्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये हार्दिक सहभागी झाला नव्हता.

हे ही वाचा : 

फुलंब्रीकर कुटुंब  कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर  या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!

शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss