Friday, April 19, 2024

Latest Posts

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

आयपीएलच्या १६ व्या सीझनचा विजेता कोण? हे काही तासातच आपल्याला समजणार आहे. ipl २०२३ च्या १६व्या सिजझनमध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. सेमीफायनल मध्ये गुजरात टायटन्स च्या विरोधात मुंबई इंडियन्स अशी चुरस बघायला मिळाली. परंतु काही थोड्याशा फरकाने मुंबई इंडियन्स ना पराभव पत्करावा लागला.

आयपीएलच्या १६ व्या सीझनचा विजेता कोण? हे काही तासातच आपल्याला समजणार आहे. ipl २०२३ च्या १६व्या सिजझनमध्ये अटीतटीचा सामना बघायला मिळाला. सेमीफायनल मध्ये गुजरात टायटन्स च्या विरोधात मुंबई इंडियन्स अशी चुरस बघायला मिळाली. परंतु काही थोड्याशा फरकाने मुंबई इंडियन्स ना पराभव पत्करावा लागला. तर गुजरात टायटन्स ने बाजी मारत आपले स्थान फायनल मध्ये रोवले. त्यामुळे आजच्या या चुरशीच्या लढ्यात धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स या दोन्ही टीम आमने सामने उभे ठाकणार आहेत. तर या सामन्यात धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स कोण विजयी संघ हे यावर्षीच्या ipl २०२३ च्या ट्रॉफीवर नाव करणार या प्रश्नाचं उत्तर काही तासांत मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे.परंतु धोनी आणि पंड्या फॅनचा विरह करण्यासाठी वरुण राजाने आपले आगमन केले आहे.

अहमदाबादमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे. आज जर कमीत कमी पाच षटकारांचा सामना झाला नाही. तर रिझर्व डेला सामना होणार आहे. याशिवाय पावसामुळे सामन्यात विलंब झाल्यास आवश्यक २० षटकांपैकी काही षटकांची संख्या कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. यानुसार, प्रत्येक संघाला किमान पाच षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आजच्या सामन्यासाठीची शेवटची वेळ रात्री १२. २६ वाजता असेल, त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल.

सोमवारीही पावसाने ख्वाडा घातल्यास गुजरातचा संघ विजेता होईल. हाती आलेल्या माहितीनुसार रिझर्व डे सोमवारी ठेवण्यात आला आहे. आजही एकही चेंडू पडला नाही, तर फायनलचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. पण सोमवारीही पाऊस पडला तर विजेता कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. जर सोमवारी पावसामुळे सामना झाला नाही. गुजरातला विजेता घोषित करण्यात येणार आहे कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

आजच्या फायनलनंतर इमोशनल पोस्ट करत केली खेळाडूने घोषणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss