Saturday, June 3, 2023

Latest Posts

विराट कोहलीच्या शतकासमोर हेनरिक क्लासेनचे शतक फिके

इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League 2023) मध्ये काल पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बगरुळू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Royal Challengers Bagarulu vs Sunrisers Hyderabad) या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुने दणदणीत विजय मिळवला आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League 2023) मध्ये काल पार पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बगरुळू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Royal Challengers Bagarulu vs Sunrisers Hyderabad) या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये विराट कोहलीने यावर्षीच्या सीजनमधील पहिले शतक तर आयपीएल मधील सहावे शतक झळकावले आहे. हे शतक झळकावत विराट कोहलीने युनिव्हर्स क्रिस गेलची बरोबरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सनरायझर्स हैदराबादचा १३ सामन्यांमध्ये नववा पराभव झाला आहे. हैदराबादने आरसीबीला १८७ धावांचा आव्हान दिले होते आणि हे आव्हान आरसीबीने सहजपणे पार केले. सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन (Heinrich Klassen) याने सुद्धा सामान्यामधे वादळी शतक झळकावले. परंतु विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकापुढे हे शतक फिके पडले. विराट कोहलीने पहिला चेंडूपासूनच जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेतला. कोहलीने ६३ चेंडूमध्ये १०० धावांची खेळी केली या खेळात विराट कोहलीने ४ षटकार आणि 12 चौकार लगावले.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने विराट कोहलीला चांगलीच साथ दिली. फाफने ४७ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी केली. या दोघांनी सामन्यामध्ये १७२ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली आणि फाफ डुप्लेसी याच्या नावावर आहे. या दोघांनी एकाच सीझनमध्ये ९०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. या सीझनमध्ये विराट कोहलीने त्याच्या बॅटने धावांचा पाऊस पडला आहे. आता गुणतालिकेमध्ये १४ गुणांसह आरसीबीचा संघ मुंबई इंडियन्सला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss