spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

‘मी दोन मुलांचा बाप…’ रोहित शर्माचं निवृत्तीवर भाष्य, सिडनी कसोटीदरम्यान ROHIT SHARMA निवृत्तीबाबत मोठा खुलासा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत होत्या की रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त होणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही शेवटची कसोटी मालिका आहे. अशा परिस्थितीत रोहितला सिडनी कसोटीतून बाहेर काढले की तो स्वतः या सामन्यातून बाहेर बसला आहे, हा सर्वात मोठा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द रोहित शर्माने दिले आहे.

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच टाईमवर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘मी स्वतः सिडनी कसोटीतून बाहेर बसलो आहे. सध्या माझी बॅट चालत नाही. त्यामुळे मी निवडकर्त्यांना आणि कोचला सांगितले आणि पाचव्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मी २ मुलांचा बाप आहे, कधी काय करायचं ते मला माहीत आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे, आणि जे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यांना संधी मिळावी म्हणून मी बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आहे.रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘आत्ता धावा येत नाहीत, पण 5 महिन्यांनंतरही येणार नाहीत याची शाश्वती नाही. मी खुप मेहनत करीन. पण हा निर्णय निवृत्तीचा नाही. लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक ठरणार नाहीत की मी निवृत्ती कधी घ्यावी.

या कसोटी मालिकेत रोहित शर्मा धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याने ३,६,१०,२ आणि ९ धावांची खेळी खेळली. म्हणजेच भारतीय कर्णधाराने ५ डावात ६.२० च्या सरासरीने एकूण ३१ धावा केल्या होत्या. याआधी बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. गेल्या ८ कसोटी सामन्यांमध्ये त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. त्यामुळे रोहितने या महत्त्वाच्या सामन्यात बाहेर बसण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधू शकेल.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss