ICC Champions Trophy 2025 Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफीला आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्यामुळे आयसीसीने आता सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे आयसीसी आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचे सर्व निर्णय घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि दुबईत करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान रंगणार आहे. या या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. ८ वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. याआधी 2017 साली अखेरीस चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीत किती सामने होणार?
यंदा या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे.
एका संघामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड 4 संघ ए गटात आहेत.
दुसऱ्या संघात ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा बी ग्रुपमध्ये समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण-कोणत्या भाषांमध्ये रंगणार?
मराठी
हिंदी
इंग्रजी
बंगाली
हरियाणवी
भोजपूरी
तमिळ
तेलुगु
कन्नडमध्ये
त्याचबरोबर हा सामना जिओ-हॉटस्टारवर एकूण 4 मल्टी कॅम फीड्सद्वारे लाईव्ह सामना पाहायला मिळेल. तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड चॅनेल्सवर सामना लाईव्ह पाहायला मिळेल. सलामीचा सामना गतविजेता-यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.