Thursday, June 1, 2023

Latest Posts

IPL2023, दिल्ली कॅपिटल्सचा संघ दहाव्या स्थानावरून नवव्या क्रमांकावर

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये गुणतालिकेत तळाशी असलेले संघ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघांमध्ये काल सामना पार पडला.

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये गुणतालिकेत तळाशी असलेले संघ दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघांमध्ये काल सामना पार पडला. या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने १५ धावांनी पंजाब किंग्सचा पराभव केला. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघाला कालच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला तसा काही फायदा झालेला नाही. परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या विजयांनंतर प्लेऑफच्या गणितामध्ये काही प्रमाणामध्ये समीकरणे बदलली आहेत. कालच्या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर विजयामुळे खूपच खुश आहे. जेव्हा संघाच्या खराब कामगिरीवर निराश असल्याची तो यावेळी म्हणाला. आमच्या संघाची फिल्डिंग खूपच खराब आहे. पण तरी आमच्या स्ट्रेंग्थवर खेळलो. घरामध्ये नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो परंतु इथे कोणत्याच अडचणी आल्या नाहीत असे डेव्हिड वॉर्नर म्हणाला.

पुढे डेव्हिड वॉर्नर David Warner) म्हणाला की, पृथ्वी शॉनं चांगली फलंदाजी केली. शॉच्या फलंदाजीचा प्रभाव पाहून आनंद झाला. रिलेनंही अप्रतिम फलंदाजी केली. घराच्या मैदानावर खेळताना आम्हाला सुधारण्याची गरज आहे आम्ही आमच्या घराच्या मैदानावरील स्कोअरवर काम करू शकलो नाही परंतु इथे दोन गुण मिळवणे चांगले होते. असे डेव्हिड वॉर्नर म्हणाला. विजयच्या आधी दिल्ली कॅपिटल्स चा संघ दहाव्या क्रमांकावर होता परंतु आता दिल्लीचा संघ १० गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. आता दिल्लीच्या संघाचा आता शेवटचा सामना राहील आहे जर त्यांनी तो सामना जिंकला तर गुणतालिकेमध्ये ते वरचे स्थान मिळवण्याची संघ असेल.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss