भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्याभ ४७४ धावांचं सडेतोड उत्तर दिल आहे. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयाचा हुरूप वाढला होता. तर प्रत्येक चेंडू टाकताना अहंकार दिसत होता. असं असताना आठव्या स्थानावर आलेल्या नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं. १९१ धावांवर सात विकेट गेल्यानंतर सहज सामना खेचून आणू असा ऑस्ट्रेलियाला विश्वास होता. कारण त्यांच्याकडे २८३ धावांची मोठी आघाडी होती. तळाच्या फलंदाजी फार फार किती धावा करू शकतात याचा अंदाज होता. रविंद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला आणि सामना हातून गेल्यातच जमा आहे असं वाटत होतं. पण नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने कमाल केली.
दोघांनी सर्वात आधीच टीम इंडियावरील फॉलोऑनचं संकट टाळलं. त्यानंतर एक एक धाव घेत ऑस्ट्रेलियाची आघाडी कमी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ९ गडी गमवून ३५८ धावा केल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी नाबाद १०५, तर मोहम्मद सिराज नाबाद 2 धावांवर खेळत आहे. खराब प्रकाशमानामुळे पंचांना सामना लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाकडे अजूनही ११६ धावांची आघाडी आहे. हि आघाडी चौथ्या दिवशी काही धावांनी कमी होऊ शकते. जर या जोडीने आणखी ५० धावांची भागीदारी केली तर ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मनसुबा उधळून निघेल. आता चौथ्या दिवशी हे दोघं फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. पहिल्या डावात भारातकडून यशस्वी जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यशस्वी जयस्वालने ११८ चेंडूत ८२ धावा करून धावचीत झाला. वॉशिंग्टन सुंदरने १६२ चेंडूत ५० धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डी १७६ चेंडूचा सामना करत नाबाद १०५ धावांवर खेळत आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका