IND vs AUS : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वतात मोठा इतिहास घडवला आहे. त्यातच आता टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झेप घेतली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळवला असून ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी २६५ धावांचा आव्हान दिलं असताना टीम इंडियाने हे आव्हान ४८.१ ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून पूर्ण केलं आहे. त्यांचबरोबर टीम इंडियाने २६७ धाव केल्या. विराट कोहली या विजयाचा मुख्य सूत्रधार ठरला असून श्रेयस अय्यरसह इतरांनीही विजयाची तोफ उडवली आहे. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला.
भारताने पहिल्यांना फलंदाजी करताना त्यांनी २६४ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळवला आहे. विराट कोहलीनं ९४, श्रेयस अय्यरनं ४५ धावा केल्या. त्याचबरोबर केएल राहुलनं नाबाद ४२ धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने २८ धावा करत गेमचेंजर ठरला. श्रेयसनंतर अक्षर पटेल मैदानात आला. विराट आणि श्रेयस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४४ धावा जोडल्या. अक्षरने या दरम्यान महत्त्वाच्या धावा केल्या आणि विजयाजवळ आणून ठेवण्यात योगदान दिलं.
अक्षरचे नेतृत्व
अक्षरने महत्वाच्या धावा करत उत्तम नेतृत्व केलं आहे. अक्षरने ३० बॉलमध्ये १ फोर आणि १ सिक्ससह २७ रन्स केल्या. अक्षरला नॅथन एलीस याने बोल्ड केलं. एका बाजूला सहकारी आऊट होत होते, मात्र विराटने एक बाजू लावून धरली होती. त्यामुळे टीम इंडियाच जिंकणार, हा विश्वास होता.
हार्दिकचे दणके ऑस्ट्रेलियाला पडले भारी
विराट आऊट झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात आला. हार्दिकने टीम इंडियाचा विश्वास सार्थ ठरवत ३ षटकार आणि १ चौकारासह २४ चेंडूत २८ महत्त्वपूर्ण २८ धावा केल्या. मात्र विजयाच्या रेषेजवळ येऊन हार्दिकला मागे फिरावं लागलं. हार्दिकनंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने ४८ व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि केएलला स्ट्राईक दिली. केएलने ४९ व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला आणि टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक दिली.
हे ही वाचा:
आरोपीला फाशी दिली तरी चालेल पण घटना सत्य आहे का नाही हे तपासायला पाहिजे,आरोपीच्या भावाचं वक्तव्य
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.