spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

IND vs AUS : कॅप्टन बुमराहचा मोठा निर्णय काय? टीम इंडियाने नववर्षात पहिला टॉस जिंकल्यानंतर..

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२०२५ कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी ४ वाजून ३० मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कर्णधार जसप्रीत बुमराह याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सामन्यासह ३-१ ने मालिका जिंकण्याचा उद्देश असणार आहे. तर टीम इंडियासमोर ही मालिका २-२ ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे साऱ्याचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये २ बदल केले आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा याने विश्रांती घेतल्याचं जसप्रीत बुमराने टॉस दरम्यान सांगितलं. रोहितच्या जागी शुबमन गिल याला संधी देण्यात आली आहे. तर आकाश दीप याला पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे आकाश दीपच्या जागी प्रसिध कृष्णा याचा समावेश करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियाकडून ३१ वर्षीय ब्यू वेब्स्टर याचं पदार्पण झालं आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्याआधी काही तासांपूर्वीच प्लेइंग
ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये १ बदल केला. मिचेल मार्श यांच्या जागी ब्यू वेबस्टर याला संधी देण्यात आली.

जसप्रीत बुमराह याने मालिकेतील पहिल्या सामन्यातही नेतृत्व केलं होतं. नियमित कर्णधार पर्थमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात कौटुंबिक कारणामुळे उपस्थित राहु शकला नव्हता. तेव्हा बुमराहने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. बुमराहने टीम इंडियाला विजयी सुरुवात करुन दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बुमराह अंतिम सामन्यात कर्णधाराच्या भूमिकेत आहे. आता बुमराहसमोर टीम इंडियाला या मालिकेत बरोबरीत आणण्याचं आव्हान आहे.

पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल,  केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली,  ऋषभ पंत (विकेटकीपर),  रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss