टीम इंडियाने दुसऱ्या डावात जबरदस्त कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं. पण यशस्वी जयस्वालच्या चुकीचा फटका टीम इंडियाला बसला. एक नाही तर तीन वेळा तीच चूक केली. त्याच्या या चुकीमुळे टीम इंडियाचं विजयाचं स्वप्न भंगलं असंच म्हणावं लागेल.तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. जसप्रीत बुमराहने पहिल्या सत्रात चार, तर मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. आधीच ऑस्ट्रेलियाकडे १०५ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण यशस्वी जयस्वाल कॅच पकडताना चाचपडताना दिसला. त्याच्या चुकीचा फटका संपूर्ण संघाला भरावा लागला. त्याने ही चूक एकदा दोनदा नाही तर तीनदा केली. त्याच्या या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्माही वैतागलेला दिसला.
तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. जसप्रीत बुमराहने पहिल्या सत्रात चार, तर मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. आधीच ऑस्ट्रेलियाकडे १०५ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण यशस्वी जयस्वाल कॅच पकडताना चाचपडताना दिसला. त्याच्या चुकीचा फटका संपूर्ण संघाला भरावा लागला. त्याने ही चूक एकदा दोनदा नाही तर तीनदा केली. त्याच्या या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्माही वैतागलेला दिसला.
इथपर्यंत सर्व काही माफ केलं. पण त्याच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. पॅट कमिन्सचा सोपा झेलही सोडला. एकीकडे विकेट गरज असताना चुका करत राहिला. ४९ व्या षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा आला होता. पण तेव्हा पॅट कमिन्स २१ धावांवर खेळत होता. तेव्हाही जयस्वालने झेल सोडला. यशस्वी जयस्वालचा हलगर्जीपणा वारंवार अधोरेखित होताना दिसत आहे. फलंदाजीतही रन नसताना धाव घेत सुटला आणि विकेट देऊन बसला. खरं तर कसोटीत संयम खूपच महत्त्वाचा असतो. पण संयम जराही नसून चोरट्या धावा घेण्याच्या नादात विकेट देऊन बसला. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजीत लय तुटली. त्यानंतर तीन झेल सोडून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलण्यात हातभार लावला.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.