spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

IND vs AUS : रोहित, सिराज आणि आकाशदीप यांची होणार सुट्टी!, या खेळाडूंना मिळेल संधी, सिडनी कसोटीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 अशी असेल…

भारतीय संघाला मेलबर्न कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे.

IND vs AUS 5th Test Playing XI : भारतीय संघाला मेलबर्न कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, आता दोन्ही संघ शेवटच्या कसोटीसाठी सिडनीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे, पण या कसोटीसाठी भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन कोणते असतील?

सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसा असेल?

सिडनी कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होणार असल्याचे मानले जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याचबरोबर या खेळाडूंच्या जागी प्रसिध कृष्णा, हर्षित राणा आणि शुभमन गिल यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. वास्तविक, भारतीय कर्णधार रोहित शर्मा एक फलंदाज म्हणून सतत फ्लॉप होत आहे. तर मोहम्मद सिराजची कामगिरी संमिश्र आहे.

टीम इंडियाची संभाव्य खेळी ११ –

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा.

हर्षित राणा प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करणार!

वेगवान गोलंदाज हर्षित राणा सिडनी कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करू शकतो. मात्र, सिडनी कसोटीसाठी भारतीय संघाचा प्लेइंग 11 कोणता आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारतीय संघाने मालिकेची सुरुवात शानदार पद्धतीने केली. टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. यानंतर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली, मात्र चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा पुन्हा पराभव झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया मालिकेत २-१ ने पुढे आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss