spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

IND vs ENG 5th T20i : इंडिया-इंग्लंडचा आजचा पाचवा सामना; जाणून घ्या सविस्तर माहिती

टीम इंडिया महाराष्ट्र दौऱ्यावर असून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना आज मुंबईत खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने या मालिकेत ३-१ अशी आघाडी मिळवली आहे. भारताने पहिला, दुसरा आणि चौथा सामना जिंकला. तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला. टीम इंडियाने 31 जानेवारीला पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये रंगतदार सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी मात करत मालिका जिंकली. त्यानंतर आता दोन्ही संघ या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. या पाचव्या सामान्याबद्दल जाणून घेऊया.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना सविस्तर माहिती

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20i सामना रविवारी 2 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. त्याचबरोबर हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार ऍपवरुन पाहायला मिळेल.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम

जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पाचवा टी 20 सामन्यादरम्यान हवामान स्थिती

मुंबईच्या हवामानानुसार पावसाची शक्यता नाही. मुंबईचे वातावरण खूप चांगले आहे. ढगाळ वातावरण नसल्यामुळे दिवसभर सूर्यप्रकाश राहील तर संध्याकाळी थंड वारे वाहतील. मुंबईचे तापमान 23 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

हे ही वाचा :

Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद

Union Minister Ramdas Athawale यांची अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात फटकेबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss