India vs England 1st ODI Toss : टीम इंडिया (Team India) आजपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून म्हणजे ६ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात झाली आहे. टीम इंडिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपुरमध्ये पार पडत असून, हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जोस बटलर हा इंग्लंडचं नेतृत्व करत आहे तर रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाची धुरा आहे. या सामन्याला १ वाहून ३० मिनिटांनी सुरु झाला आहे. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. जोस बटलर याने बॅटिंगचा निर्णय घेतला असून टीम इंडियाकडून विराट कोहली (Virat Kohali) दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सांगितलं आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया थेट (Champions Trophy) चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा अभ्यास कसा झाला आहे हे स्पष्ट होईल.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या सामन्यात खेळणार नाही. विराटला गुडघ्याच्या दुखापतीमुळे झाल्यामुळे होत खेळणार नसल्याची माहिती टीम इंडिया कर्णधार यांनी दिली. तसेच गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि हर्षित राणा (Harshit Rana) या दोघांचं पदार्पण झालं आहे. विराटच्या जागी संघात यशस्वीला संधी दिली आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
हे ही वाचा :
“पक्षाने अपमानित केल्याची त्यांची…”Praful Patel यांचे भुजबळांविषयीचे वक्तव्य