अभिषेक शर्मा भारत विरुद्ध इंग्लंड : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर १५० धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माने १३ सिक्स आणि ७ फोरसह १३५ धावांची खेळी खेळली आहे. टीम इंडियाने अभिषेकच्या या खेळाच्या जोरावर वानखेडे स्टेडियमध्ये २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून २४७ धावा केल्या. टीम इंडियाने आपली भूमिका योग्यरीत्या बजावत विजय मिळवला आहे. इंग्लंडचा ९७धावांवर टीम इंडियाने १५० धावांच्या फरकाने विजय मिळवला. टीम इंडिया विजयासह ५ सामन्यांची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली. अभिषेक शर्मा याच्या बॅटिंगनंतर बॉलिंगनेही प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले. अभिषेक शर्माने २ विकेट्स घेतल्या असून त्याला ऑलराउंडर कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि पहिल्याच चेंडूपासून तुफानी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. संजू सॅमसनने पहिल्याच षटकात १६ धावा केल्या पण पुढच्याच षटकात तो बाद झाला. मात्र अभिषेक शर्माने दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवत आपली तुफानी फटकेबाजी सुरूच ठेवली.
अभिषेक शर्मा इंग्लंडला पडला भारी
अभिषेकने या सामन्यात विक्रमी खेळी केली. अभिषेकने ५४ बॉलमध्ये २५० च्या स्ट्राईक रेटने १३ सिक्स आणि ७ फोरसह १३५ धावा ठोकल्या. पण सुरुवातीच्या काळात जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांच्याविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या फॉरमॅटमध्ये भारताचे हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. टीम इंडियाने पहिल्या ६ षटकात ९५ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने याआधी २०२३ साली इंग्लंडवर १६८ धावांनी मात केली होती. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. अभिषेक हा टीम इंडियाचा हिरो ठरला आहे.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला. वरुणने या मालिकेतील ५ सामन्यांत एकूण १४ विकेट्स घेतल्या. वरुणने या दरम्यान एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. वरुणने घेतलेल्या १४ विकेट्ससाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. वरून चक्रवर्ती याने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या असून राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात देखील त्याने ५ विकेट्स मिळवल्या. चेन्नईमध्ये २ तर कोलकात्यामध्ये ३ फलंदाजांना परतीचा मार्ग दाखवला.
हे ही वाचा :
“पक्षाने अपमानित केल्याची त्यांची…”Praful Patel यांचे भुजबळांविषयीचे वक्तव्य