spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

IND vs ENG: भारताच्या स्टार खेळाडूला मिळाला इशारा, इंग्लंडविरुद्ध तसे न केल्यास त्याला टीम इंडियातून…

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर, भारतीय संघ व्यवस्थापन नवीन T20 संघ तयार करण्यात व्यस्त आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर, भारतीय संघ व्यवस्थापन नवीन T20 संघ तयार करण्यात व्यस्त आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये, अभिषेक शर्मा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना टॉप ऑर्डरमध्ये सातत्यपूर्ण संधी मिळाल्या आहेत परंतु त्याच्या कामगिरीत सातत्य राखण्यात तो अपयशी ठरला आहे. अभिषेककडे मैदानात चौफेर फटके मारण्याची क्षमता आहे आणि त्याने जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या ४७ चेंडूत शतक झळकावले होते. आता माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने अभिषेकबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

अभिषेक शर्माच्या फॉर्मवर चिंता व्यक्त करताना आकाश चोप्रा म्हणाला, “अभिषेकच्या फॉर्ममध्ये चढ-उतार आले आहेत. त्याने कारकिर्दीतील दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले. तो टॅलेंटने परिपूर्ण आहे, पण कामगिरीत सुधारणा झालेली नाही. या 5 सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली तर मला वाटते. आकाश चोप्रा म्हणाला की, अभिषेक शर्माला तेच करावे लागेल जे संजू सॅमसनने गेल्या 3 सामन्यांमध्ये केले आहे. तसे झाले नाही तर त्यांची जागा यशस्वी जैस्वाल किंवा अन्य कोणी घेईल. अभिषेक शर्माने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये 11 डावांमध्ये 171.81 च्या स्ट्राइक रेटने 256 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट चांगला आहे, पण त्याची सरासरी २३.२७ चिंताजनक आहे. आत्तापर्यंत अभिषेकने आपल्या T20 कारकिर्दीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर पहिला सामना 22 जानेवारीला म्हणजेच आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना असेल. ईडन गार्डन्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटचा सामना झाला तेव्हा इंग्लंडने बाजी मारली होती.

हे ही वाचा : 

Davos Investment : Tata Group करणार ३०,००० कोटी गुंतवणूक- CM Devendra Fadnavis

Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss