spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडच्या एक दिवसीय मालिकेसाठी नागपूरचं पोलीस प्रशासन सज्ज; वाचा सविस्तर

IND vs ENG : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND Vs ENG) दरम्यान होणार सामना नागपुरात रंगणार आहे. हा सामना एक दिवसीय आहे. कारण या मालिकेनंतर टीम इंडिया थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा अभ्यास कसा झाला आहे हे स्पष्ट होईल. नागपूर – वर्धा रोडवरील व्ही.सी.ए क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील स्टेडियमवर 6 फेब्रुवारी रोजी हा सामना होणार असून तब्बल 2000 पोलीस कर्मचारी आणि 600 वाहतूक शाखेचे पोलीस (Nagpur Police) कर्मचारी या बंदोबस्तासाठी लावले जाणार आहे. नागपुरात आतापर्यंत ४४ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. याचाच आढावा घेत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मात्र कंबर कसली आहे. यंदा पोलिसांनी भरपूर पार्किंग जागा उपलब्ध केल्याचे सांगितले आहे. 7 हजारपेक्षा जास्त चार चाकी वाहन आणि 10 हजार दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध करण्यात आल्याचे नागपूर वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

नियम मोडल्यास कारवाई केली जाणार
नागपूर वाहतूक पोलिसांनी काही नियम जाहीर केले आहेत. एवढेच नाही तर स्टेडियम पासून एक किलोमीटर अंतरावर प्रत्येकी दहा एकर पेक्षा जास्त आकाराच्या दोन पार्किंग स्पेस राखीव ठेवण्यात आले आहे. तिथून बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ज्या दिवशी हा एक दिवसीय सामना खेळाला जाईल त्या दिवशी वर्धा रोडवर बुटीबोरी ते खापरीदरम्यान जड वाहनांची वाहतूक पूर्ण दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आली आहे. सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांनी नागपूर वरून स्टेडियमकडे जाताना आणि स्टेडियमवरून नागपूरकडे येताना महामार्गावर कोणतेही वाहन थांबवू नये अन्यथा त्यांच्या कठोर कारवाई करण्यात येईल असे नागपूर वाहन पोलिसांच्या सांगितले आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार) , शुबमन गिल , श्रेयस अय्यर , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , ऋषभ पंत , केएल राहुल , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , अर्शदीप सिंग , हर्षित राणा , कुलदीप यादव , मोहम्मद शमी.

इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार) , हॅरी ब्रूक , बेन डकेट , जो रूट , फिलिप साल्ट , जेमी स्मिथ , जेकब बेथेल , ब्रायडन कार्स , लियाम लिव्हिंगस्टोन , जेमी ओव्हरटन , जोफ्रा आर्चर , गस अ‍ॅटकिन्सन , साकिब महमूद , आदिल रशीद , मार्क वूड.

हे ही वाचा :

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss