England Playing 11 1st T20 Against India : इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20I मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र पाहुण्या इंग्लंडने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.
इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या T20 साठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. बेन डकेट आणि फिल सॉल्ट डावाची सुरुवात करतील. तर कर्णधार जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. धाडसी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधील फलंदाजी विभाग खूपच मजबूत दिसत आहे. 6 फलंदाज टी-20 चे स्पेशालिस्ट खेळाडू आहेत. दरम्यान, सातव्या क्रमांकावर खेळणारा अष्टपैलू जेमी ओव्हरटन फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या संघाकडे पाहता, ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत