IND vs ENG T20 : पुण्यात खेळला गेलेला चौथा टी-२०च्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. भारताने सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. भारतासाठी या सामन्यात हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांचे मोलाचे योगदान आहे. या सामन्यात भारताने १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु इंग्लंडचा संघ १६६ धावांवर आउट झाला. या विजयाबरोबर भारताने पाच सामान्यांच्या मालिकेत ३-१ अभेद्य आघाडी घेत विजयी ठरला.
भारत आणि इंग्लंड यांच्या पाच सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्याच्या मालिकेचा निकाल लागला. भारताने पहिला आणि दुसरा सामना जिंकला आणि त्यानंतर तिसरा सामना इंग्लंडच्या पारड्यात गेला. इंग्लडला भारतासोबत सुरु असलेल्या मालिका विजयासाठी ही मालिका समानतेवर आणण्यासाठी चौथ्या सामन्यातील विजय महत्वाचा होता. त्यामुळे इंगलंड जोरदार तयारीत होते. पण सर्व प्रयत्न पणाला लावून ११९ व्या चेंडूवर मागे पडले. भारताच्या 79 धावांवर पाच विकेटही गेल्या होत्या. त्यामुळे फार काही मोठी धावसंख्या होईल असं वाटत नव्हतं.परंतु शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी हा डाव फिरवला आणि या जोडीने सहाव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडला चांगलाच घाम फुटला. त्यामुळे शेवटच्या दोन
षटकात शिवम दुबेला बाद करण्याचं आव्हान होतं. शिवम दुबे शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला पण तोपर्यंत इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.
इंग्लंडने शेवटचं जेमी ओव्हर्टनला सोपवलं होतं. त्याचा पाचवा चेंडू म्हणजेच 119 वा चेंडू टाकला हा चेंडू शिवम दुबेच्या हेल्मेटवर जोरात आदळला. त्यामुळे इंग्लंडचा सामना पारड्यात गेला.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. टीम इंडियासाठी कन्कशन पर्याय म्हणून खेळलेल्या हर्षित राणाने शानदार कामगिरी करत 3 बळी घेतले.हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावली. या दोन्ही खेळाडूंनी 53-53 धावांची खेळी खेळली.अशा प्रकारे टीम इंडियाने हा सामना 15 धावांनी जिंकला आणि मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली.
कर्णधार जोस बटलर यांची प्रतिक्रिया
हार्षितने आपल्या फलंदाजीत सुधारणा केली आहे. हा खेळाचा एक भाग आहे आणि आम्हाला हा सामना जिंकणं आवश्यक होतं. पण आम्ही निर्णयाने असहमत आहोत.’, असं इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला.
हे ही वाचा :
केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार