spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

IND vs NZ, Champions Trophy Final: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये काँटे की टक्कर; रोहितचं नेमकं धोरण काय?

IND vs NZ, Champions Trophy Final: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झेप घेतली आहे. २५  वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाईल. टीम इंडिया यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चा आहेत. पण, फायनलला टीम इंडियासमोर आलेलं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. २०१७ मध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा फायनल्सचा सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्ताननं टीम इंडियाचा पराभव केला होता. अशातच आता टीम इंडिया स्वप्न पूर्ण करणार का? रोहितसेना चॅम्पियन ट्रॉफीचं गिफ्ट देशाला मिळवून देणार का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

IND vs NZ, Champions Trophy च्या सामन्यात ओपनिंग कोण करणार?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात, उपकर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आतापर्यंत त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसणार आहे. अशातच शुभमन गिलबाबत बोलायचं तर, त्याची बात काही औरच… चॅम्पियन ट्रॉफीच्या सर्वच्या सर्व सामन्यांत गिलनं धुवाधांर फलंदाजी केली आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहित की शुभमन नक्की कोण बाजी मारेल असा प्रश्न पडला आहे.

मिडल बॅटिंगची जबाबदारी अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि उत्तम फॉर्ममध्ये असलेला युवा फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर असणार आहे. तर सामना पूर्ण करण्याची आणि विकेटकीपिंगची जबाबदारी केएल राहुलकडे असणार आहे. त्याचबरोबर के.एल. राहुलनं आतापर्यंत फलंदाजी करताना कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी
गोलंदाजीची धुरा म्हणजे मोहम्मद शामी. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत शामी खूपच चांगल्या खेळी खळताना दिसत आहे. तर हार्दिक पांड्या दुसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो. या स्पर्धेत पांड्यानं त्याला चांगली साथ दिली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारत संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ न्यूझीलंड संघ :
मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.

हे ही वाचा : 

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी कसा गेमचेंजर ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी

Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss