IND vs NZ Champions Trophy 2025 Final : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ९ मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सँटनरने प्लेइंग-११ मध्ये बदल केला असून दुखापत झाल्यामुळे मॅट हेन्नी हा सामना खेळणार नाही आहे. त्याच्या जागी वेगवान गोंलंदाज नाथन स्मिथला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात कोणताही बदल केला नाही आहे. भारतीय संघ पाचव्यांदा मेगा स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात आमनेसामने आले आहेत. परंतु टीम इंडियाने वनडे सामन्यात सलग १५ व्यांदा टॉस हरला आहे.
भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विजय आणि पराभवाचा विक्रम बरोबरीचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत फक्त दोन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने एक सामना जिंकला आहे, तर न्यूझीलंड संघानेही एक सामना जिंकला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारत संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ न्यूझीलंड संघ :
मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.
IND vs NZ Final : न्यूझीलंडला चौथा धक्का
24 व्या षटकात न्यूझीलंडला 108 धावांवर चौथा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजाने टॉम लॅथमला एलबीडब्ल्यू आऊट केले आहे. टॉम लॅथम 30 चेंडूत 14 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us