IND vs NZ Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वतात मोठा इतिहास घडवला आहे. त्यातच आता टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झेप घेतली आहे. 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत. विजेतेपदाच्या सामन्यात दोन वेळची चॅम्पियन टीम इंडिया आणि एक वेळची चॅम्पियन न्यूझीलंड यांच्यात एक रोमांचक सामना रंगणार आहे. एकीकडे दुबईच्या मैदानावर सलग ४ सामने जिंकणारा भारतीय संघ आहे. भारताने या मैदानात जास्त सामने खेळले असले तरी दुबईतील खेळपट्टी व हवामान सारखे बदलत असते. तरीही हा सामना दुबईच्या मैदानावर रंगणार आहे.
भारत-न्यूझीलंडचा सामना कुठे, केव्हा आणि कधी खेळाला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी 9 मार्च 2025 रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी दुपारी 2:00 वाजता होईल.
त्याचबरोबर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर थेट पाहू शकता. हे हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण-कोणत्या भाषांमध्ये रंगणार?
- मराठी
- हिंदी
- इंग्रजी
- बंगाली
- हरियाणवी
- भोजपूरी
- तमिळ
- तेलुगु
- कन्नड
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ भारत संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ न्यूझीलंड संघ :
मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचीन रवींद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मॅट हेनरी, कायल जेमीन्सन आणि विलियम ओरूर्के.
हे ही वाचा :
Navneet Rana : औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या- नवनीत राणा
Follow Us