spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Ind vs NZ : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचा पटकावला मान; सेलिब्रेशन झालं दणक्यात

Ind vs NZ : भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ६ विकेट्सने पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा मान पटकावला आहे. भारताचे सलग दुसरे आयसीसी स्पर्धा विजेतेपद असून यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 विकेट्स गमावून 6 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 254 धावा केल्या आणि ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी तर 2013 नंतरची पहिली वेळ ठरली. टीम इंडियाने या विजयासह इतिहास घडवला.
भारताच्या विजयाचा पाया रोहित शर्मानं रचला. रोहित शर्मानं 76 धावाची आक्रमक खेळी करुन भारताला भक्कम सुरुवात करुन दिली. यानंतर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजानं दमदार फलंदाजी केली.
या विजयाने संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण असून सर्वजण सेलिब्रेनशच्या मोडमध्ये आहेत. या विजयाचा आनंद भारतीय संघानेही उत्तम घेतला. या विजायसोबतच क्रिकेटच्या मैदानात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माची दोस्ती आणि अनोखा अंदाजही दिसला.
याशिवाय भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये देण्यात आले. दुसरीकडे, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी टीम इंडियाला 125,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये देखील मिळाले.

 

सौरव गांगुलीनं भारताच्या विजयानंतर भारताची दमदार कामगिरी, गेल्या दोन जागतिक स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केलीय. संघात सखोलता आहे. सर्वांचं अभिनंदन अन् रोहित शर्मा अद्भूत कर्णधार आहे, असं सौरव गांगुली म्हणाला.

 

Latest Posts

Don't Miss