Ind vs Pak Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी२०२५ चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. क्रिडा जगतातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ६ विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं दिलेल्या २४२ धावांचं लक्ष्य भारतानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीनं सर्वाधिक ९५ धावा केल्या.
Champions Trophy 2025: टीम इंडियाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात पाकिस्तानी संघावर दिमाखदार विजय मिळवला. विराट कोहलीची शतकी खेळी या सामन्याचे वैशिष्ट्य ठरली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तानी या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांचा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली. पाकिस्तानी संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर २४२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे आव्हान भारतीय संघाने जवळपास ४३ व्या षटकात पूर्ण केले. विराट कोहली (Virat Kohli) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सहजपणे पाकिस्तानचे आव्हान पेलले. भारताच्या या विजयासाठी आणि पाकिस्तानच्या पराभवासाठी कोणत्या गोष्टी मारक ठरल्या?
१.विराट कोहली बॅक
या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीचा हरवलेला फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय होता. त्यामुळे विराट कोहली भारतीय संघात असावा की नाही, इथपर्यंत चर्चा रंगली होती. मात्र, काल पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. विराट कोहलीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडत हा सामना भारताच्या हातून निसटणार नाही, याची काळजी घेतली. विराट कोहलीने संयमी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत ७२ धावा या धावून काढल्या होत्या. विराट कोहलीने कालच्या सामन्यात कुठेही विनाकारण आक्रमकता दाखवली नाही. खेळपट्टीचा नूर आणि संघाची गरज ओळखून विराट कोहली थंड डोक्याने खेळला.
२. पाकिस्तानची गोलंदाजी फेल
पाकिस्तानी संघाची गोलंदाजी हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान मानले जाते. पाकिस्तानी संघ हा नेहमी फलंदाजांपेक्षा त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे कालच्या सामन्यात भारतीय फलंदाज विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजी असे युद्ध पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कालच्या सामन्यात पाकिस्तानचा एकही वेगवान गोलंदाज प्रभावी ठरला नाही. ज्या शाहीन आफ्रिदीच्या नावाने अनेक फलंदाजांच्या मनात धडकी भरते तो भारतीय फलंदाजांसमोर निष्प्रभ ठरला. शाहीनच्या गोलंदाजीचे दडपण न घेता भारतीय फलंदाजांनी त्याने टाकलेले अनेक चेंडू सीमापार भिरकावून दिले.
३ . भारतीय फलंदाजांची भागीदारी तोडण्यात पाकिस्तानला अपयश
पाकिस्तानी संघाने दिलेल्या २४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरल्यानंतर रोहित शर्मा २० धावा करुन माघारी परतला. मात्र, त्यानंतर शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. अबरार अहमदच्या अप्रतिम चेंडूवर शुभमन गिल४६ धावांवर बोल्ड झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली मैदानात होते. सुरुवातीला श्रेयस अय्यर खूपच धीम्या गतीने धावा काढत होता. यावेळी त्याच्यावर दडपण निर्माण करुन त्याला बाद करण्यात पाकिस्तानी संघाला अपयश आले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवले.
४ . माईंड गेममध्ये पुन्हा भारताची अग्रेसर
पाकिस्तानी संघ मोठ्या लढतींमध्ये विशेषत: भारतीय संघाविरूद्धच्या सामन्यात मानसिक दडपणाखाली येतो, अशी चर्चा कायम असते. कालच्या सामन्यातही हीच गोष्ट दिसून आली. पाकिस्तानी खेळाडूंच्या देहबोलीत कुठेही हा सामना जिंकायचाच, आहे, अशी जिगर दिसून आली नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या अशा एकाहून एक सरस फलंदाजांचा भरणा असलेल्या भारतीय संघासमोर पाकिस्तानने नांगी टाकली होती. भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय या स्पर्धेत खेळत आहे. मात्र, तरीही पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही
५ . एकेरी-दुहेरी धावा रोखण्यात पाकिस्तानला अपयश
या सामन्यात विराट कोहलीने नाबाद १०० धावा केल्या. त्यापैकी ७२ धावा विराटने धावून काढल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करेल आणि बाद होईल, असा पाकिस्तानी संघाचा अंदाज होता. मात्र, विराट कोहली याने डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी केली. या गोष्टींमुळे इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यात काल भारत जिंकला.
MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश