spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूची BCCI ला शिवीगाळ

India vs Pakistan : भारतीय क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy 2025) साठी पाकिस्तानात संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन पाकिस्तानचा एका क्रिकेटपटूने शिवीगाळ करण्यावर उतरला आहे. तो बीसीसीआयला वाटेल ते नको, नको ते बोलला. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च यजमानपद पाकिस्तानकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवायला नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचा आपला निर्णय जाहीर केल्यापासून क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तसेच BCCI च्या निर्णयावरुन पाकिस्तानात हंगामा सुरु आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तनवीर अहमदने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तो शिवीगाळ करण्यावर उतरलाय. त्याने खुलेआम सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द असे वापरले आहे.

भारत पाकिस्तानात येणार नसल्याने तनवीर अहमद मागच्या काही दिवसांपासून आक्रमक वक्तव्य करतोय. ‘बीसीसीायने आपल्या हातात बांगड्या भराव्या’ असं त्याने म्हटलं आहे. तो एवढयावरच थांबला नाही, भारतीय क्रिकेट बोर्डाबद्दल खोटारडे, नीच, बदमाश आणि दुटप्पी असे आपत्तीजनक शब्द वापरले. बीसीसीआयपेक्षा एका गाढवावर विश्वास ठेवणं केव्हाही चांगलं. तो फसवणार नाही असं तनवीर अहमद म्हणाला. त्याने पाकिस्तानी मीडियाला भारतीय मीडियाला बोलवू नका असे अपील त्यांनी केल आहे.

BCCI च्या या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतासोबत कुठल्याही टुर्नामेंटमध्ये न खेळण्याची धमकी दिली होती. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार १२ नोव्हेंबरला ICC ला एक ईमेल पाठवण्यात आला. त्यात टीम इंडियाला न पाठवण्यामागची भारतीय क्रिकेट बोर्डाने ठोस कारणं सांगावी, असं म्हटलं होतं. आयसीसीची सर्व टीम सोबत चर्चा सुरु आहे. टुर्नामेंटच्या शेड्युलबद्दलही चर्चा आहे. आयसीसीने बॅकअप प्लान म्हणून दक्षिण आफ्रिकेत टुर्नामेंट आयोजित करण्याचा प्लान तयार ठेवल्याच काही असं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

…मला कसलंही श्रेय नकोच | Shrikant Shinde vs Raju Patil | MNS | Raj Thackeray

Pimpri Assembly constituency: पिंपरी विधानसभेच्या रिंगणात कोण ठरणार अव्वल? । Anna Bansode

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss