India vs South Africa T20 : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी २०i सामना हा सेंच्युरियन येथे होणार आहे. उभयसंघ या ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे तिसरा सामना जिंकून कोणता संघ आघाडी घेतं? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. टीम इंडियाकडे सेंच्युरियनमध्ये विजयासह ६ वर्षांआधीचा हिशोब क्लिअर करण्याची दुहेरी संधी आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला सेंच्युरियनमध्ये ६ वर्षांआधी पराभूत केलं होतं. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि यंग बिग्रेड पलटवार करत सेंच्युरियनमधील पराभवाचा वचपा घेत मालिकेत २-१ ने आघाडी घेतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
उभयसंघात २१ फेब्रुवारी २०१८ रोजी टी २०i मालिकेतील दुसरा सामना हा सेंच्युरियन येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हा भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८९ धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान १८.४ ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत भारताने विजयी सुरवात १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसरा सामनाही जवळपास जिंकला होता, मात्र दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या क्षणी कमबॅक करत सामना जिंकला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता तिसऱ्या सामन्याची सर्वाना प्रतिक्षा आहे.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी २०i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.
T२०I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स
हे ही वाचा:
रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोला, उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्याने संतापले
Shivtare – Jagtap यांच्यात विजयासाठी घमासान, पवारनिष्ठ संभाजीराव Purandar वर झेंडे फडकवणार