spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

IND vs SA: भारत आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामन्यांमध्ये ; मुख्य प्रशिक्षकाची भूमिका कोण बजावणार?

India vs South Africa T20 : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ 8 नोव्हेंबरला म्हणजेच आज डर्बनमध्ये पहिला टी-२० सामना खेळणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात आजपासून टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांची ही मालिका असेल. ही मालिका दक्षिण अफ्रिकेत खेळवण्यात येणार असून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

तसेच दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) दौऱ्यावर भारतीय संघ ८ नोव्हेंबरला म्हणजेच आज डर्बनमध्ये पहिला टी-२० सामना खेळणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी संघ गाकेबरहा येथे जातील. त्यानंतर उर्वरित दोन सामने सेंच्युरियन (१३ नोव्हेंबर) आणि जोहान्सबर्ग (१५ नोव्हेंबर) येथे खेळवले जाणार आहेत.

व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची बजावणार भूमिका:

सूर्यकुमार यादवला टी-२० फॉरमॅटचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे गौतम गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या टी-२० मालिकेत प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याचे कारण म्हणजे गौतम गंभीर न्यूझीलंड कसोटी मालिकेत व्यस्त होता. आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

टीम इंडियाची संभाव्य Playing XI:
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, रिंकू सिंह, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, यश दयाल

भारताचा संघ:
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, रिंकु सिंह, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, यश दयाल, वरुण चक्रवर्थी, रमनदीप सिंग, विजयकुमार वैशाख

दक्षिण अफ्रिकेचा संघ:
एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसेन, हेन्रीक क्लासेन, पेंट्रिक कुगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली एमपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेल्टन, अॅडिले सिमलेन, लूथो सिपम आणि ट्रिस्टन स्टब्स.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक:

८ नोव्हेंबर – पहिली टी-२०, डर्बन
१० नोव्हेंबर- दुसरा टी-२०, गेकेबरहा
१३ नोव्हेंबर- तिसरा टी-२०, सेंच्युरियन
१५ नोव्हेंबर- चौथा टी-२०, जोहान्सबर्ग

हे ही वाचा:

PM Narendra Modi LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Narendra Modi LIVE: लाडकी बहिन योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss